मुंबई | आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात तसेच सातारा आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील क्षेत्रात 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यान वर्तवली आहे. 12 जुलैपर्यत हा जोर कायम असणार आहे.
अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात ढग निर्माण होत आहेत. त्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे. अनेक राज्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. जिल्हयातील काही नद्यांनी पाणी पातळी ओलांडली आहे.
यातच पश्चिम महाराष्ट्रातील(Maharashtra) कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीपातळीत वाढ झाली होती. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या पावसाची पातळी स्थिर आहे.नांदेडमधील मुसऴधार पावसाने जिल्ह्यातील पिक पाण्याखाली गेलं आहे.नांदेड मध्ये ढगसदृश्य पाऊस झाला आहे. घरामध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे शांळाना सुट्टी देण्यात आली आहे.
साताऱ्यात आज आणि उद्या रेड अर्लट जारी करण्यात आलं आहे. सांवतवाडी-बेळगाव राज्य महामार्ग बंद करण्यात आला आहे. आजारांनाही सुरवात झाली आहे. पाण्याची पातळी वाढल्याने धरणांची दारे उघडण्यात आली आहेत. खबरदारी म्हणून जिल्हयामध्ये एनडीआरएफ पथक दाखल झाली आहेत. नदिकाठच्या गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या
“शिवसेना पुन्हा कधीच उभी रहाणार नाही, शिवसेनेेची आजची अवस्था ठाकरे पिता-पुत्रामुळेच”
अमरनाथ ढगफुटीतील मृतांचा आकडा वाढला, महत्त्वाची माहिती समोर
“महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा दिल्लीचा विचार, तुम्ही भाजपच्या हो ला हो केलं तर मुंबई हातची जाईलच”
काँग्रेस नेत्याने अग्निपथ योजनेशी जोडला शिंजो आबेंच्या मृत्यूशी संबंध, म्हणाले…
शिंदे-फडणवीस अमित शहांच्या भेटीला, तिघांमधील बैठक रात्री 2 वाजता संपली
Comments are closed.