राहुल गांधी पप्पू राहिले नाहीत, ते परमपूज्य झालेत- राज ठाकरे

मुंबई | राहुल गांधी यांच्यात झालेल्या बदलांचं चांगलंच कौतुक होताना दिसतंय. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही हे मान्य केल्याचं समोर आलंय. 

गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी इतका वादळी प्रचार केलाय, की भारतीय जनता पक्षासाठी ते आता पप्पू राहिले नाहीत तर तरे पंपू (परमपूज्य) झालेत, असं मार्मिक वाक्य राज यांनी उच्चारलंय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे अधिकृत या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आलंय.