गुन्हा रद्द झालेला नाही; धनंजय मुंडेंनी दिशाभूल करू नये- राजाभाऊ फड

मुंबई | धनंजय मुंडेंवरील गुन्हा रद्द झालेला नाही. त्यामुळे त्यांनी लोकांंची दिशाभूल करू नये, असं भाजप नेते राजाभाऊ फड यांनी म्हटलं आहे.

सरकारी जमिनीच्या बेकायदा हस्तांतरप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

धनंजय मुंडेंवरील गुन्हा आज पण कायम असून त्यांच्यावर चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आपल्याला स्थगिती मिळाली, गुन्हा संपला असं माध्यामांना सांगून लोकांची दिशाभूल  करण्याचा प्रयत्न मुंडेंनी करू नये, असं राजाभाऊ फड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

महत्वाच्या बातम्या

-बिहार सरकारने वृद्धांसाठी केली ‘या’ नव्या पेन्शन योजनेची घोषणा

-डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याने नवजात बाळाचा मृत्यू

-रामराजेंकडून उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना

-“देशात आज राजेशाही असती तर मी दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन मोकळा झालो असतो”

-रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध; यांना उमेदवारी देण्याची मागणी!