बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षासाठी तडीपार

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे (Rajesh Kale) यांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलं आहे. सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून त्यांना तडीपार करण्यात आले आहे. सोलापूरचे पोलिस आयुक्त हरिश बैजल यांनी हा आदेश काढला आहे.

राजेश काळे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, शिविगाळ करणे असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. याआधी राजेश काळे यांना अटक देखील झालेली आहे. सोलापूर महापालिकेचे उपयुक्त पांडे यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याबद्दल त्यांना पोलिसांनी अटक केली होती, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली आहे.

आज पहाटेच विजापूर पोलिसांनी राजेश काळे यांना ताब्यात घेतले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचं कडूकर यांनी सांगितलं आहे. तर काळे यांनी आपल्यावर यापूर्वीही द्वेषातून अनेक आरोप केले आहेत. तसेच ही कारवाईसुद्धा राजकीय द्वेषातून केली गेली असल्याचं म्हटलं आहे. मी याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, राजेश काळे  हे भाजपचे निलंबित नगरसेवक आहेत. त्यांना सोलापूरमध्ये आर के या नावाने ओळखले जात होत. राजेश काळे यांच्यासोबतच सेटलमेंट भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मुलासही 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. चेतन गायकवाड असे त्याचे नाव आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही”

“…त्यामुळे शिवसेना गांधी घराण्याभोवती पिंगा घालतीये”

ज्वालामुखीचा उद्रेक होताच जीव मुठीत घेऊन पळत सुटले लोक; धडकी भरवणारा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

‘शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात’; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

“देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More