बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मिटकरी, तोंडाला लकवा झाला होता ना तुमच्या, गावरान गाईचं तूप लावा”

मुंबई |  येत्या 24 जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आता पुण्यात पोस्टरबाजीला सुरुवात झाली आहे. या पोस्टरबाजीतून पुण्याच्या विकासावरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई चालू असल्याचं पहायला मिळतंय. या पोस्टरबाजीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली होती. त्याला आता भाजपचे आमदार राम सातपुते यांनी जोरदार प्रत्त्युतर दिलं आहे.

पुण्यात जागोजागी लावण्यात आलेल्या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचे शिल्पकार म्हणण्यात आलं आहे. त्यावर, ‘आता तर कमाल झाली. देवेंद्र फडणवीस चक्क पुण्याचे शिल्पकार. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली होती. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त, असंही मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटला राम सातपुते यांनी ट्विटने उत्तर दिलं आहे.

मिटकरी तब्येतीची काळजी घ्या, तोंडाला लकवा झाला होता ना आपल्या? साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाला शिल्पकार शब्द काय कळणार? आपण तर प्रख्यात बाजारू धंदेवाईक विचारवंत आहात, त्यामुळे तुमचा आणि त्या शब्दाचा संबंध नसणारच. तोंडाला गावरान गाईचे तूप लावा फरक पडेल, अशी जहरी टीका राम सातपुते यांनी केली आहे.

दरम्यान, अकोल्याच्या एका कार्यक्रमात अमोल मिटकरी छक्कड गात असताना त्यांचं तोंड वाकडं होऊ लागलं होतं. अर्धांगवायूचा झटका आल्याचा संशय आल्यानं त्यांना आयकॉन रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. राम सातपुते यांच्या टीकेला या घटनेचा संदर्भ आहे.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

“…तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोटांगण घातलं असतं”

शिल्पा शेट्टीचा पती प्रसिद्ध अभिनेत्रीला घेऊन कसा बनवायचा अश्लील चित्रपट?, पाहा आरोप

‘मी 5 वेळा मोबाईल बदलला पण…’; प्रशांत किशोर यांचा धक्कादायक आरोप

कोरोना लसीचं आता लय टेंशन घेऊ नका, कारण…

गंदी बात!, ‘या’ अभिनेत्रीमुळे पोलिसांना सापडला राज कुंद्रा!

शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं आता काही खरं नाही; होऊ शकते ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More