Ram Mandir | 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर (Ram Mandir ) उद्घाटन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक कलाकार आणि दिग्गजांची या ठिकाणी उपस्थिती होती. हा सोहळा देशासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं मोदी यांनी म्हटलं. मात्र आता याच राम मंदिराबद्दल एका आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
या आमदाराने भव्य राम मंदिराला अपवित्र ठरवलंय. इतकंच नाही तर, कुठल्याही भारतीय हिंदूने अशा अपवित्र स्थळाची पूजा करु नये, असं त्यांनी म्हटलं आहे. आमदाराच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झालाय.
तृणमुल काँग्रेसच्या आमदाराचं वादग्रस्त विधान
रामेंदु सिन्हा (Ramendu Sinha Roy) असं या आमदाराचं नाव असून तारकेश्वर येथील तृणमुल काँग्रेसचे ते आमदार आहेत. त्यांच्या राम मंदिर (Ram Mandir) संदर्भातील वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. रामेंदु सिन्हा यांच्या वक्तव्यामुळे त्यांना भाजपसह सर्वच पक्षांकडून घेरलं जातं आहे. त्यांचा आता निषेध केला जात आहे.
यह है तृणमूल कांग्रेस के नेताओं की सच्चाई। हिन्दुओं पर आक्रमण करते करते उनकी हिम्मत इतनी बड़ गई है कि वह अब भगवान श्री राम के भव्य मंदिर को ‘अपवित्र’ बताने की धृष्टता कर रहे हैं।
तारकेश्वर विधानसभा क्षेत्र के विधायक – रामेंदु सिन्हा रॉय, जो आरामबाग संगठनात्मक जिले के टीएमसी… pic.twitter.com/RZ95yPDY5V
— Suvendu Adhikari (Modi Ka Parivar) (@SuvenduWB) March 4, 2024
बंगालचे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी रामेंदू सिन्हा यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी लिहिलं की,’मी रामेंदु सिन्हा यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. अशा द्वेषपूर्ण वक्तव्यासाठी मी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची तयारीही करत आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’
भाजपची कारवाईची मागणी
पुढे ते म्हणाले की, तृणमुल काँग्रेसचे नेते असेच आहेत. हिंदूंवर (Ram Mandir) आक्रमण करण्याची त्यांची हिम्मत इतकी वाढली आहे की, आता ते भगवान श्री राम यांच्या भव्य मंदिराला अपवित्र ठरवत आहेत. त्यांच्यावर आता कारवाई होणारच.
दरम्यान, वादग्रस्त विधान करणारे रामेंदु सिन्हा आरामबाग संघटनात्मक जिल्ह्याचे टीएमसी अध्यक्ष आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यावर आता मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
News Title- Ramendu Sinha Roy controversial statement about Ram Mandir
महत्त्वाच्या बातम्या –
अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार
IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ
कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”