रावसाहेब दानवेंनी बळकावलेल्या शाळेतील गाशा गुंडाळला!

जालना | केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या आदर्श शाळेवर मिळवलेला बेकायदेशीर ताबा अखेर रावसाहेब दानवे यांच्या मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने सोडला आहे.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्राने यासाठी निधी पुरवला. कालांतराने केंद्राने अंग काढून घेतल्यानंतर राज्याने भोकरदनमधील इमारतींचं बांधकाम पूर्ण केलं. मात्र त्या इमारतींमध्ये दानवेंच्या मंडळानं शाळा सुरु केली होती.

दरम्यान, प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर त्यांनी नाममात्र दराने ही इमारत पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्याने अखेर आपला गाशा गुंडाळला आहे. 

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या