”शरद पवारांना समजून घेण्यासाठी 100 जन्म घ्यावं लागतील”

मुंबई | पहाटेच्या शपथविधीतून राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली, पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांनी (Sharad Pawar) हे भाष्य केलं. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या शपथविधीमागे पवारच होते का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

याचप्रकरणात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारलं, राऊतांनी याला उत्तर दिलं आहे. शरद पवारांना समजून घेण्यासाठी 100 जन्म घ्यावं लागतील असं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. यापूर्वी देखील राऊतांनी असं वक्तव्य केलं होतं त्याच वाक्याचा पुनरुच्चार राऊतांनी केला आहे.

भाजपचं सरकार दिल्लीत होतं. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार येऊ नये अशी कोंडी केली होती. आमदारांचं बहुमत दाखवून देखील काहीच झालं नसतं कारण, ज्या प्रकारचे राज्यपाल राजभवतान होते त्यामुळं ते शक्य नसतं.

या पहाटेच्या शपथविधीमुळं ही कोंडी फुटली आणि लख्य उजाडलं. फक्त 24 मिनिटात राजवट निघाली आणि 24 मविआचा मार्ग मोकळा झाला. पवारांनी जे सांगितलं ते सत्य आहे का? असा प्रश्न राऊतांना विचारला गेला पवारांना समजून घेण्यासाठी 100 जन्म घ्यावं लागतील हे मी आधीच म्हणलं होतं. तेव्हा माझ्यावर टिका झाली. तुम्हाला आता कळलंच असेल असं राऊत म्हणाले.

मविआची झालेली कोंडी फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामुळं होऊ शकलं. त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो,असं संजय राऊत म्हणाले. मला पहाटेच्या शपथविधीबाबत माहित नाही. यामुळं मात्र राजकीय कोंडी फोडायला नक्कीच मदत झाली,असंही राऊत यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या