मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असून अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपला दिल्लीत पराभव स्वीकारावा लागला आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपची खिल्ली उडवली आहे.
आता असा राजा आहे ज्याच्याकडे राजधानीच नाही, असा टोला रूपाली चाकणकर यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यावर चाकणकर यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच पक्ष सत्तेत येण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेल्या आपच्या कार्यकर्त्यांचंही चाकणकर यांनी अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, दिल्लीत झालेल्या सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत आपने भाजपला आस्मान दाखवलं आहे. यामुळे आता ‘आप’ला रोखण्याचं भाजपसमोर आव्हान असणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर भाजपचा बुडबुडा फुटला- जयंत पाटील
तीनपेक्षा जास्त जागा आल्यास तो आमचा विजय- चंद्रकांत पाटील
महत्वाच्या बातम्या-
“काँग्रेसनं अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व स्वीकारावं”
किर्तनात सांगितलेल्या ‘त्या’ फॉर्मुल्यामुळे इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
भाजपसमोर आता नवं आव्हान; केजरीवाल मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत?
Comments are closed.