बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई | पुण्याच्या फायरब्रँड नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर अखेर मनगटावर घड्याळ बांधलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

रूपाली पाटील ठोंबरे मनसेमधून (MNS) बाहेर पडल्यावर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. रूपाली पाटील यांनी युवासेना सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांची भेट घेतल्याने त्यांच्या शिवसेना (Shivsena) प्रवेशाची शक्यता वर्तवली जात होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रूपाली पाटील ठोंबरे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला आहे. रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षातून ऑफर असल्याचा खुलासा केला होता.

दरम्यान, जो पक्ष मला माझ्या खळखट्याक स्टाईलसह स्विकारेल त्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या होत्या. त्यानूसार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा’; इंद्राणी मुखर्जींच्या दाव्याने देश हादरलं

अंकिता लोखंडेला पतीने लग्नात दिलं खास गिफ्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल

Gold Silver Price: सोने चांदीचे भाव पुन्हा वधारले; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे दर

जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

“मुस्लिमांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही तर ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More