मुंबई | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सध्या अडचणीत आलेले सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आलं आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. पण मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयित असलेल्या वाझेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आलं आहे.
सध्या कोठडीत असलेल्या वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आलेली. तसेच अटक करण्यात आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याची मागणी केली जात होती.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यातील स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडली होती.
थोडक्यात बातम्या-
गंगुबाईच्या लुकनंतर आलियाचा ‘हा’ लुक होतोय प्रचंड व्हायरल; पाहा आलियाचा नवीन लुक
महागाईचा कहर! आता खाद्यतेलाच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्यांनी वाढल्या
भाजपच्या या आमदाराने योगी आदित्यनाथांसोबत केली छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना; म्हणाले
राज्यात मोठ्या राजकीय घडीमोडी सुरु, शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक
पुढील दोन दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या कारण!
Comments are closed.