बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुखःद! मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे काळाच्या पडद्याआड; कॅन्सरशी झुंज अपयशी

मुंबई | आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारे अभिनेते आणि मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचे निधन झाले आहे. मोघे यांनी आज सकाळी 6.00 वाजता अखेरचा श्वास घेतला. माधव मोघे हे थर्ड स्टेज कॅन्सरशी लढत होते. कॅन्सरशी चाललेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली.

मोघे यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. माधव मोधे यांनी अनेक बॉलिवूड सिनेमातील कलाकारांची मिमिक्री करुन प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी ब्लॉकबस्टर ‘शोले’ या सिनेमातील ठाकूरची मिमिक्री केली होती.

1993 साली रिलीज झालेल्या ‘दामिनी’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता.

दरम्यान, आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिमिक्रीसाठी मोघे प्रख्यात होते. याबरोबरच वेगवेगळ्या कॉमेडी शो मध्येही त्यांचा सहभाग होता. त्या मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

थोडक्यात बातम्या –  

मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, पण सक्रिय कोरोना रुग्णसंख्या घटली 

‘नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यावर मी फोन केला होता, पण….’,

मोठी बातमी! मराठा आंदोलकांवर दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

“विधानसभेने केलेल्या सहकार कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही”

“पवार साहेबांनी नाना पटोलेंना तर पान टपरीवालाच करून टाकला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More