हॉटेल मालकाने अडवल्यानंतर सदाभाऊ खोत संतापले; राष्ट्रवादीला दिला गंभीर इशारा
सोलापूर। सांगोला येथे हॉटेलची उधारी न दिल्याने रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत (Sadhabhau Khot) यांचा व्हिडीओ सगळीकडे जोरदार व्हायरल होतोय.
गुरुवारी, सोलापूर येथे सांगोल्यातील एका हॉटेल मालकाने यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर हॉटेलची उधारी न दिल्याचा आरोप केला. सदाभाऊ खोत हे पंचायत राज बैठकीच्या निमित्ताने सांगोला दौऱ्यावर आले होते. सांगोला येथे बोलत आसताना खोत म्हणाले की, या मागे राष्ट्रवादीचं कारस्थान आहे माझ्याकडून कोणतेही पैसे राहिले नाहीत.
राष्ट्रवादी कडून आपल्या जीवाला धोका आहे. तसेच टोमॅटो सारखे गाल असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याला सांगू इच्छितो की मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, अशी टीका खोत यांनी राष्ट्रवादीवर केली. 2014 नंतर मी सांगोल्याचा दौरा केला. मात्र अशोक शिनगारे नावाची कोणी व्यक्ती मला भेटली नाही. तिथं कोण कोण जेवलं हे देखील त्याला माहित नाही, असं खोत यांनी म्हटलं. जेव्हा हा सगळा गोंधळ झाला तेव्हा सर्व मीडिया ता ठिकाणी उपस्थित होते.
हॉटेल मालक अशोक शिनगारे यांच्यावर 353 खाली गुन्हा पोलिसांनी दाखल करायला पाहिजे होता. पण पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नव्हते. त्यांने माफी मागीतली आहे मग गुन्हा कशाला दाखल करायचाय, असं पोलिसांनी म्हटलं. राष्ट्रवादी गुन्हेगारांना सातत्याने पाठीशी घालत आहे, असं वक्तव्य खोत यांनी केली. तर दुसरीकडे अखेर हॉटेल मालक अशोक शिनगारे वर 341,186 आणि 104 असे कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘चहापावडर सरकार उधारीवर घेतंय’ सांगत मंत्र्याने नागरिकांना केलं चहा कमी पिण्याचं आवाहन
‘अवो आयका माझं, बापाला फोन करा माझ्या’; चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
‘शरद पवार हो म्हणाले असते तर…’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी; खाद्यतेलाच्या दरात कपात
दिवाळीपर्यंत नागरिकांना ‘हे’ मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता
Comments are closed.