Top News महाराष्ट्र सोलापूर

विनोदाचार्य निर्माण होणे ही कीर्तन परंपरेची अधोगती- सदानंद मोरे

Loading...

माळशिरस | ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकारांच्या वक्तव्यावरुन संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संमेलाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी इंदोरीकरांवर सडकून टीका केली आहे. ते नातेपुतेमधील वारकरी कीर्तन संमेलनात बोलताना त्यांनी इंदोरीकरांवर निशाणा साधला आहे.

कीर्तन ही जीवननिष्ठा झाली पाहिजे. कीर्तन म्हणजे करमणूक नव्हे. विनोदाचार्य निर्माण होणं ही कीर्तन परंपरेची अधोगती आहे, असं परखड मत सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे.

1289 मध्ये नामदेव रायांनी कीर्तन परंपरेचे पुनर्जीवन केले आहे. तुकोबारांनी 17 व्या शतकात कळस केला. इंदोरीकरांची कीर्तनं महाराष्ट्राच्या परंपरेत बसत नाहीत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकोबा रायांचा तर आपण इंदोरीकरांसारखा विचार करु शकत नाही, असं सदानंद मोरे म्हणाले आहेत.

गेली 50-55 वर्षे कीर्तनं ऐकतो. मामासाहेब दांडेकर आणि त्यांच्या आधीच्या कीर्तनकारांची कीर्तनं ऐकली त्यामध्ये असे विनोद कधीच नव्हते, असं सदानंद मोरे म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

…परत म्हणू नका, बुलाती है मगर जानेका नहीं- तृप्ती देसाई

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही- सदानंद मोरे

महत्वाच्या बातम्या-

माफी मागितली तरी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल व्हायला हवा- तृप्ती देसाई

अहो फडणवीस, राज्याची काय पूर्ण देशाची निवडणूक परत घ्या; पवारांचं फडणवीसांना आव्हान

अखेर इंदोरीकर महाराजांची माघार; व्यक्त केली दिलगिरी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या