मनसेचा भोंगा, सेनेला धोका! संजय राऊत म्हणाले, “आमचा अयोध्या कार्यक्रम ठरला”
मुंबई | राज्याचं राजकारण हिंदूत्वाच्या मुद्द्यावर तापलेलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लागोपाठ दोन सभा घेत राज्यात हिंदूत्वाचा मुद्दा परत एकदा उपस्थित केला आहे. शिवसेनेवर सातत्यानं विरोधकांकडून हिंदूत्व आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर करत टीका करण्यात येते. परिणामी शिवसेनेकडून अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यात रामराज्य आणण्याचा आमचा संकल्प कायम आहे. उद्धव ठाकरेंनी राज्याची सत्ता हाती घेतल्यापासून अनेक संकटं आली पण त्यांनी अनेक संकल्प पुर्ण केले आहेत. आता आम्ही अयोध्येला जाणार आहोत. नाशिकच्या शिवसैनिकांमार्फेत अयोध्येसाठी एक कार्यक्रम आखण्यात आला आहे, असं राऊत म्हणाले आहेत.
शिवसेनेच्या या कार्यक्रमाला आता मोठं स्वरूप आलं आहे. परिणामी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना आमंत्रण देण्याचं ठरलं आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. मे महिन्यात शिवसेनेचा अयोध्येत कार्यक्रम होणार आहे, असं राऊत यांनी जाहीर केलं आहे. आम्ही अयोध्येला आज नाही बाबरीचा ढाचा पाडला गेला तेव्हापासून जातो, असं राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असताना शिवसेनेनं अयोध्या दौरा जाहीर केला आहे. परिणामी राज्यात जोरदार राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
‘हिमायलात जाईन’ म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांसाठी राष्ट्रवादीकडून तिकीट बूक!
‘देवाचं नाव घेणं जर गुन्हा असेल तर…’; नवनीत राणांचं शिवसैनिकांना सडतोड उत्तर
“भाजपसोबत आण्णांचे चांगले संबंध होते, तरीही त्यांनी परंपरा पाळली नाही”
“एकटे नाना लढले तर फेस आला, मी लढलो असतो तर…”
‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणातील पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड!
Comments are closed.