‘कोण किरीट सोमय्या?’, संजय राऊतांचा सोमय्यांवर घणाघात
मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) विरूद्ध भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) वाद आता शिगेला पोहोचला आहे. किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर राजकारण अधिकच तापलं.
मेधा सोमय्यांनी बुधवारी शिवडी कोर्टात राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. शौचालय खोटाळा प्रकरणी आरोप करत राऊतांनी नाहक बदनामी केली असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.
सोमय्यांनी हा मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर राऊतांनी कोण किरीट सोमय्या?, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तर अब्रुनुकसानीचा दावा केला म्हणजे त्यांनी काय मोठे दिवे लावले?, असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला.
दरम्यान, तुम्ही तोंडाला येईल ते बोलायचं. तुम्ही बकबक करायची आणि आम्ही तुमच्या बकबकीला उत्तर द्यायचं, असा टोला राऊतांनी लगावला. तर सोमय्यांच्या फ्रॉडचं मोठं प्रकरण लवकरच बाहेर काढणार असल्याचा इशारा देखील संजय राऊतांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
“एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला जायला निघाले”
‘दरेकर साहेब…’; रोहित पवार आणि दरेकरांमध्ये रंगला ट्विटर वॉर
तारक मेहताच्या एका भागासाठी शैलेश लोढा यांना मिळायचे ‘इतके’ लाख, मानधन ऐकून थक्क व्हाल
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
मन उडु उडु झालं! मराठमोळ्या पद्धतीने पार पडला ह्रता आणि प्रतीकचा लग्न सोहळा, पाहा फोटो
Comments are closed.