बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डान्स इंडिया डान्स फेम ‘या’ कलाकाराचा गंभीर अपघात; देतोय मृत्यूशी झुंज

कोलकाता | डान्स इंडिया डान्स या शोच्या चौथ्या सिजनमध्ये प्रसिद्धीस आलेल्या स्पर्धकाचा भीषण अपघात झाला आहे. आपल्या नृत्यानं सगळ्यांच्या मनावर छाप पाडणारा बिकी दास लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाला आहे. बिकी लॉकडाऊनच्या काळात कोलकातामध्ये फूड डिलिव्हरीचं काम करत आहे. हे काम करत असतानाच त्याचा अपघात झाला. त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीनं धडक दिली. परिणामी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

त्यानं आपल्या ब्रेकडान्स शैलीनं स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यावेळी त्याला डीआयडीचा ब्रेक डान्सर म्हणून ओळखलं जायचं. डान्स इंडिया डान्सच्या चौथ्या सिजनचा भाग असूनही त्याला नंतर पाहिजे तसं यश मिळालं नाही. परिणामी तो दुसरीकडं नोकरी करुन आपला उदरनिर्वाह करत आहे. तर, लॉकडाऊनच्या काळात फूड डिलिव्हरी बॉयचं काम त्यानं सुरू केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, बिकी दास फूड डिलिव्हरी करायला आपल्या गाडीवरून जात असताना दुसरी दुचाकी त्याच्या गाडीवर येऊन धडकली आणि अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच त्याला रूग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर त्याच्या पत्नीनंं पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात त्याच्या छातीच्या फासोळ्या तुटल्या सोबतच शरीरावर बऱ्याच गंभीर जखमाही झाल्या आहेत.

दरम्यान, लॉकडाऊनच्या आधी बिकी दास डान्स क्लास घेत होता. मात्र, लॉकडाऊन झाल्यापासून तो उदरनिर्वाहसाठी मिळेल ते काम करत होता. मागच्या एक आठवड्यापासूनच तो फूड डिलिव्हरीचं काम करत होता. यातच त्याचा अपघात झाला आहे. तर, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त, मी रोज करते तुम्ही पण करा- हेमा मालिनी

भारतात आढळला कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट; रूग्णाच्या शरीरात होतोय ‘हा’ बदल

‘या’ कारणामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली, अन्यथा निर्बंध हटले असते!

आता काय होईल ते होईल, मी मेलो तरी चालेल पण…- संभाजीराजे आक्रमक

रायगडावर संभाजीराजेंची गर्जना, पहिल्या मराठा मोर्चाची तारीख अन् ठिकाणही ठरलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More