बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरं कोणी असतं तर…’, अपक्ष आमदाराचं मोठं वक्तव्य

अहमदनगर | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना फूटली आहे. शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 असे एकूण 50 आमदार सध्या शिंदे यांच्या गोटात आहेत. शिवसेनेकडे आता जेनतेम 15 आमदार आपले म्हणण्यासारखे उरले आहेत. अपक्ष आमदार आणि माजी मंत्री शंकर गडाख (Shankar Gadakh) यांनी अहमदनगर येथे जाहीर भाषणात शिवसेनेच्या या वस्तूस्थितीवर भाष्य केले आहे.

राज्यात नाही तर देशात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) जागी दुसरा नेता असता आणि त्याच्या हातात शिवसेनेसारखी जहाल संघटना असती तर त्याने बोट दाखवे पर्यंत रक्ताचे पाट वाहीले असते. पण उद्धव ठाकरेंनी तसे केले नाही. त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. यावेळी गडाख यांनी उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचे देखील कौतुक केले.

गडाख म्हणाले, उद्धव साहेब हे अजिबात राजकीय व्यक्ती नाहीत. शिवसेना ही अतिशय जहाल संघटना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या रक्तात एक वेगळी रग निर्माण केली आहे. यावेळी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी इशारा केला असता तर, रक्ताचे पाट वाहिले असते. परंतु उद्धव ठाकरेंनी तसे केले नाही. त्यांनी स्वत: कमीपणा घेऊन हे सर्व सांभाळले. त्यांनी संयमाने भूमिका घेतली.

मी अपक्ष निवडून आलो तरी उद्धव ठाकरेंनी मला संधी दिली. ते राजकीय व्यक्ती नव्हते म्हणून मला संधी दिली. मला काही आमदारांनी हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगितले होते. अखेर विस्फोट झाला. मलाही गुवाहाटीचा फोन आला होता. पण मी उद्धव ठाकरेंसोबत रहाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंशी फोनवर बोललो देखील होतो, असे शंकर गडाख यावेळी भाषणात म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

‘अब सभी को सभी से खतरा है’, संजय राऊतांच्या ट्विटने खळबळ

आता विमानप्रवास करा फक्त 26 रुपयांत, व्हिएतजेट एअरलाईन्सची खास ऑफर

‘हजारो रुपयांची दाढी कटींग करून पैश्यांच्या जोरावर आलेलं हे सरकार’, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

‘सत्ता बदलली, आता गाठ माझ्याशी आहे’; निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

उपवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही?, नवीन संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More