नगर | लोकसभा निवडणुकीत हवी ती जागा न मिळाल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान आघाडीकडून निवडणूकीचं तिकीट नाकारण्यासंदर्भात सुजय यांनी गौप्यस्फोट केलाय.
नगरमध्ये एका सभेदरम्यान बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, “हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने माझं तिकीट कापलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला हेलिकॉप्टरविषयी प्रश्न केला आणि माझं तिकीट कापलं गेलं.”
सुजय यांच्या सांगण्यानुसार, “शरद पवार यांनी त्यावेळी मला प्रश्न केला की, उमेदवारी देण्याअगोदर तू जर हेलिकॉप्टरमधून फिरत असशील तर निवडून कसा येणार? याचनंतर आघाडीकडून मला तिकीट मिळालं नाही.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात काम करण्याचा मला अभिमान आहे. आणि त्या हेलिकॉप्टरमुळे कोणाला फायदा झाला असेल मला माहिती नाही. पण त्यावेळी जरी मला ते नुकसान वाटत असलं तरीही आता त्याचे फायदे दिसत,” असल्याचंही सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
…तर राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले
…मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल
…तर उपसभापतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासही तयार- अशोक चव्हाण
शरद पवार हॅट्स ऑफ!, आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचं अप्रूप वाटलं- पंकजा मुंडे
“उद्धव ठाकरेंमुळे राणेंना गेल्या 15 वर्षात स्वतःच्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले”
Comments are closed.