“सवर्णांना दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”!

मुंबई |  केंद्र सरकारने सवर्णांना दिलेलं 10 टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असं भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलं आहे.

मी काही घटनातज्ञांशी बोललो. त्यांच्या मते हे आरक्षण कोर्टात टिकणारं नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आरक्षण टिकण्यासाठी घटनीदुरूस्ती करण्यात आली, असं जरी सरकार सांगत असलं तरी ते आरक्षण कोर्टात टिकणार नाही असं घटनातज्ञांचं मत आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शरद पवार रविवारी कोल्हापुर दौऱ्य़ावर आले होेते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं स्पष्ट केली.

महत्वाच्या बातम्या-

-“10 टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही”

-आगामी निवडणुकांचं युद्ध जिंकायचं आहे, फेकू सरकार पाडायचं आहे- अशोक चव्हाण

-शरद पवार पंतप्रधान होतील असं वाटत नाही- रामदास आठवले

-“आता मोदी चहा विकणार आणि अमित शहा वडे विकणार”

-…अन् ‘स्वाभिमानी’चे नेते नारायण राणे भाजपच्या निवडणूक जाहिरनामा बैठकीला हजर!