लाल रंगाच्या जिल्ह्यात भगव्याचा प्रवेश झालाच कसा?- शरद पवार

अहमदनगर | एकेकाळी अहमदनगर हा लाट बावट्याचा बालेकिल्ला होता. कधी कधी मला गंमत वाटते या जिल्ह्यात भाजप आला कसा?, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. ते राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे कॉम्रेड पी.बी. कडू यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

ज्या जिल्ह्याचा रंगाच लाल आहे, त्या जिल्ह्याचं भगवेकरण झालं कसं हे काय माझ्या डोस्क्यात शिरत नाय, असं शरद पवार यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवला. तसेच आगामी काळात नक्कीच परिवर्तन होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.