बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजकारण सोडून हिमालयात जायची संधी कोल्हापूरकरांनी दिली होती, पण…”

मुंबई | कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपचा (BJP) पराभव झाला. कोल्हापूरातील भाजपच्या पराभवावरून सामना अग्रलेखातून भाजप आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका करण्यात आली आहे. कोल्हापुरचा विजय हा जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना चपराक आहे, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

भाजपचे बगलबच्चे देशभरात धार्मिक विषाणु पसरवत आहेत. धार्मिक हिंसेचे वनवे पेटत असताना चार राज्यातील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. ही भाजपला मोठी चपराक आहे, अशी टीका शिवसेनेने (Shivsena) केली आहे.

राजकारण सोडून हिमालयात जाऊ अशा घोषणाही चंद्रकांत पाटलांनी केल्या होत्या. कोल्हापूरकरांनी त्यांना ही संधी दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती. पण आता चंद्रकांत पाटलांनी त्यावरूनही पलटी मारली, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण ते इथे राहतील तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारचा विजय होत राहिल, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे. तर चंद्रकांत पाटील स्वत: पोटनिवडणूक लढवतील असं वाटलं होतं. परंतू निवडणुकीच्या वेळी ते गायब झाले, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“कपड्यांचे रंग बदलून कधीही हिंदुत्त्व येत नाही, ते तर…”

‘… तर आमचेही हात बांधलेले नाहीत’, राज ठाकरेंचा थेट इशारा

“अरं…मला बी तमाशाला बोलवा”, अजितदादांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला

…अन् हलगीच्या तालावर अमोल कोल्हेंनी धरला ठेका; व्हिडीओ तुफान व्हायरल

“आयत्या बिळात नागोबा”, प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More