मुंबई | बाॅलिवूड (Bollywood)अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या(Sushant Singh Rajput) आत्महत्येला अडीच वर्षे पूर्ण झाली. परंतु तरीही या प्रकरणावरून ओराप-प्रत्यारोप सुरूच आहे. परंतु नुकतेच या प्रकरणाबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नुकताच कपूर रूग्णालयातील शवागृहातील कर्मचारी रूपकुमार शाह यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळं सिनेसृष्टीला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
रूपकुमार शाह म्हणाले आहेत की, सुशांतची आत्महत्या झाली नाही तर हत्या झाली आहे. सुशांतचा मृतदेह रूग्णालयात आला तेव्हा त्याच्या अंगावर जखमा होत्या. तसेच शरीराला मुका मार लागला होता.
मृतदेहावर शवच्छदेन होत असताना मी तिथेच होतो. मी डाॅक्टरांना सांगितलं की सुसाईड केस नाही, ही मर्डर केस आहे. मात्र डाॅक्टरांनी लक्ष दिलं नाही, असंही शाह यांनी सांगितलं आहे.
शाह हे गेल्या दीड महिन्यापूर्वी निवृत्त झाले आहेत. नोकरीत असताना त्रास होऊ नये,म्हणून मी इतक्या दिवस गप्प होतो असंही शाह म्हणाले आहेत.
दरम्यान, याबाबत एका वृत्तवाहिनीने कपूर रूग्णालयातील डाॅक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी डाॅक्टरांनी याबद्दल माहित नसल्याचं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.