नवी दिल्ली | देशात दिवसेंदिवस हत्या होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच दिल्लीच्या किशनगढ परिसरात असाच एक प्रकार घडला आहे. विवाहित महिलेचे अनेकांबरोबर अनैतिक संबंध असल्यामुळं प्रियकराने महिलेची हत्या केली असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाबाबत तपास केला असता, 32 वर्षीय मृत महिलेचे आपल्या पतीच्या मित्राशी अनैतिक संबंध होते. परंतू त्या महिलेचे अजून अनेक पुरुषांसोबत संबंध असल्याचं प्रियकराला समजलं. त्याला ही बाब सहन झाली नसल्याने त्याने महिलेच्या पतीला अनैतिक संबंधाबाबत सगळा प्रकार सांगितला. मात्र घरात अनेक वाद सुरु असल्यामुळं महिलेच्या पतीने यावर कोणतंच ठोस पाऊल उचललं नाही. हे लक्षात येताच प्रियकराने तीन मित्रांना सोबत घेऊन महिलेची हत्या करण्याचा कट रचला.
9 फेब्रुवारी रोजी प्रियकराने महिलेचा आधी गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. नंतर महिलेचा चाकूने गळा कापून हत्या केली. हा सगळा प्रकार लपवण्यासाठी प्रिकराने दिल्ली पोलिसांना हा प्रकार चोरीमुळं घडला असल्याचं सांगितलं. रुममधून 2 हजार रुपये आणि मृत महिलेचा मोबाईल घेऊन गेले. तसंच प्रियकराने मारझोड झाल्याचंही खोटं सांगितलं. पुरावे मिटवण्यासाठी प्रियकराने चाकू पार्कमध्ये फेकून दिला. गळा दाबलेला स्कार्फही त्यानं जाळून टाकला असल्याचं डीसीपी इंगित प्रताप सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी तपास केल्यानंतर 48 तासांत या प्रकऱणाचा छडा लावला. या हत्येमागे मृत महिलेचा प्रियकर असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी प्रियकरासोबत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे.
थोडक्यात बातम्या-
अक्षय कुमारचं टेन्शन वाढलं, ‘अशा’प्रकारे बसू शकतो मोठा फटका
राज्य सरकारचा फ्लिपकार्टसोबत करार, तुम्हालाही होऊ शकतो फायदा
सचिनच्या मुलाचं काय होणार?; आज होणार महत्त्वाचा फैसला
‘या’ गावात सरपंच झाला की माणूस मरतोच म्हणायचे; महिलेनं घेतला धाडसी निर्णय!
शिवजयंतीची नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार!
Comments are closed.