बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते’; आदित्य ठाकरेंचा सूचक इशारा

मुंबई | कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) टेन्शन वाढवलं आहे. अशातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा काॅलेजविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुंबईत कोरोना आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांनी महत्त्त्वाची माहिती दिली. पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. पण पॅनिक व्हायची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ओमिक्राॅन जास्त गंभीर नसल्याचा समज आहे. तसे निरिक्षणही समोर आली आहेत. पण ते तसंच राहील का? यावर सविस्तर संशोधन झालेलं नाही. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, शाळा, कॉलेज याविषयी आपण ट्रिगर लावलेले आहेत. ते हिट झाल्यानंतर त्याविषयी निर्णय घेतला जाईल. गरज पडली, तर पुढच्या आठवड्यात त्याविषयी निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

Corona: राष्ट्रवादी काॅंग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

‘…पण केंद्राचा त्यांच्यावर दबाव आहे’; संजय राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला

“…हे आम्ही बघू, बाहेरच्यांनी नाक खुपसायची गरज नाही”

‘…माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही’; मुख्यमंत्र्याच्या पत्रावर राज्यपालांची नाराजी

‘…अन्यथा अजून कडक निर्बंध लावले जातील’; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More