बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सीतलवाड यांना अटक, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

मुंबई | सर्वाेच्च न्यायालयाने 24 जून रोजी, 2002 गुजरात दंगलीच्या एसआयटी अहवालाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयाने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर 64 जणांना 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी एसआयटीच्या अहवालानुसार क्लीन चिट दिली होती. गुजरात दंगलीत मारले गेलेले माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकीया जाफरी यांनी एसआयटी अहवालाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यांनी या खटल्यातून नरेंद्र मोदींच्या सुटकेवर आक्षेप घेतला होता.

या खटल्यात तीस्ता सीतलवाड यांनी न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याप्रकरणी, त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 468 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यांना मुंबई येथील जुहु येथून अटक करण्यात आली.गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शनिवार दि. 25 जूनला त्यांना त्यांच्या रहात्या घरातून चौकशीसाठी अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले आहे.

तीस्ता सीतलवाड यांनी 2002 गुजरात दंगलप्रकरणी खोटी आणि चुकीची माहीती दिली असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्यानंतर सीतलवाड यांना अटक करण्यात आली.

न्यायालयाने आपले निरीक्षण नोेंदवले असून त्यात त्यांनी, तीस्ता सीतलवाड यांनी झाकीया जाफरी यांना भावनिक करत त्यांचा फायदा घेत तत्कालीन अधिकारी आणि मंत्र्यांना यात अडकविण्याचे प्रयत्न केले. असे म्हंटले आहे. झाकीया जाफरी यांनी एसआयटीच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळली.

थोडक्यात बातम्या – 

‘माकडं जशी…’; असदुद्दीन ओवैसींनी आमदारांना सुनावलं

राज्यपाल इज बॅक, भगतसिंह कोश्यारींना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

“काय झाडी.., काय डोंगार.., काय हाटेल….. मग महाराष्ट्र काय स्मशान आहे का?”

“हिम्मत असेल तर राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा”

‘कब तक छीपोगे गोहाटीमे’; झिरवळांचा फोटो शेअर करत राऊतांनी आमदारांना डिवचलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More