नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा आता राष्ट्रवादीचा ठाकरेंना झटका!
मुंबई | राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) भाजपचा (Bjp) कट्टर विरोधक मानला जात असला तरी नागालँडमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्यात.
जळगावात राष्ट्रवादीने आता ठाकरे (Thackeray) गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख आणि युवासेनेचे जिल्हा समनव्यकांसह अनेक शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
दरम्यान, एकीकडे जळगावमध्ये ठाकरे गटाकडून पक्ष बांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना जुन्या कार्यकर्त्यांना डावल्या जात असल्याच्या कारणाने ठाकरे गटात नाराजीचा सूर वाढल्याचं पाहायला मिळतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
- अत्यंत धक्कादायक घटना! जादूटोण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं
- “शरद पवारांनी महाविकास आघाडी सोडून मोदींसोबत काम करावं”
- सोमय्यांवर झालं बूमरँग; मुंबई उच्च न्यायालयाने दिला तगडा झटका
- पोरीच्या धाडसाला सलाम; आजीसाठी 10 वर्षांची नात चोरासोबत भिडली, पाहा व्हिडीओ
- जातीवरून अजित पवार सभागृहात भडकले; सत्ताधाऱ्यांना झापलं
Comments are closed.