महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला झटका!

Photo Credit- Facebook/ Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई |  युती तुटून आघाडीचं राजकारण सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला होता. शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणएकर यांनी तो अर्थातच फेटाळला होता. त्यावर भाजपने कोर्टात धाव घेतली होती.

गेल्या मुुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरूनही आम्हाला डावलून महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद दिल्याचा आरोप भाजपने केला होता.

मुंबई हायकोर्टाने प्रकरणात भाजपविरोधात निकाल दिला होता. यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील भाजपची याचिका फेटाळून लावली आहे.

विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे भाजपचे नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हा मनमानी निर्णय असल्याचे सांगत त्या निर्णयाला रिट याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. या याचिकेवर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असलेले रवी राजा यांनी सुद्धा प्रतिवाद केला होता.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने भाजपची याचिका फेटाळून लावत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहील असा निकाल दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री इन अ‌ॅक्शन मोड; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश!

लॉकडाऊनसंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

पुण्यातील ‘या’ भागात विद्यार्थ्यांसाठी सरकार 9 मजली भव्य वसतीगृह उभारणार!

‘लिहून घ्या, …त्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस’; भाजपच्या या आमदाराने सांगितली वेळ!

…म्हणून पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या