“जिकडे सूर्य उगवतो तिकडे नमस्कार करणारी लोकं; त्यांच्या जाण्याने कुठलाही धक्का नाही”

मुंबई |  राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवकचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सचिन अहिर यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

जिकडे सूर्य उगवतो तिकडे नमस्कार करणारी लोकं आहेत. संधीसाधूपणाचं राजकारण अहिरांनी केलं आहे. स्वता:च्या फायद्यासाठी अहिरांनी पक्षाचं नुकसान केलं, अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली आहे.

संधीसाधू लोकांचं अशा प्रकारचं राजकारण चालू असतं… त्यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला कुठलाही धक्का बसला नाही. याउलट आम्ही त्यांच्या मतदारसंघात जोमाने आणि नेटाने पक्षसंघटन वाढवू, असंही चव्हाण म्हणाले.

जर पवार साहेबांबद्दल अहिरांना एवढाच जर आदर असता तर त्यांनी पक्षच सोडलाच नसता… त्यांनी सरळ सांगायला हवं होतं की स्वत:च्या फायद्यासाठी पक्ष सोडतोय, असा घणाघात चव्हाण यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अखेर लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर; काँग्रेससह प्रमुख पक्षांचा सभात्याग

-बरं झालं गेले… आम्हाला युवकांना संधी देता येईल- मेहबूब शेख

-भाकड म्हशींच्या गोठ्याचे मालक होत असल्याबद्दल उद्धव ठाकरेंचं अभिनंदन!

-पवार साहेब एवढे ह्रदयात होते तर मग प्रेमभंग का केला??- सक्षणा सलगर

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!