बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चित्रा वाघ एवढा आकांड तांडव का करतीये?’; माजी IPS अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल

नाशिक | चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून ठाकरे सरकार आणि संजय राठोडांवर गंभीर आरोप केले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले. चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांना माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक फेसुबक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पूजा चव्हाण मृत्यूचा तपास व्हायला पाहिजे. दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. पूजाचा मृत्यू म्हटलं तर अपघात किंवा आत्महत्या या दोन शक्यता आज वर आलेल्या बातम्या आणि आरोप वरून वाटतं. मी 35 वर्षे पोलिस दलात नोकरी केली. अनुभवी आणि चाणाक्ष पोलिस अधिकाऱ्याने दोन तास घटनास्थळावर तपास केला तर तो खून आहे की अपघात आहे, की आत्महत्या आहे की ते आम्ही 99 टक्के ओळखतो. एखाद्या घटनेमध्ये खून असेल तर तो राजकीय दबावाखाली दडपला जातो का? माझं मत असं की, मुळीच नाही, असं सुरेश खोपडे म्हणालेत.

या केसमध्ये सत्ताधारी मंत्र्याचं नाव घेतलं जातं. अशा केस मध्ये राजकीय दबाव असू शकतो पण त्याच बरोबर पोलिसावर विरोधी पक्ष, मीडिया, सामान्य जनता, सोशल मीडिया, याचा दबाव पोलिस यंत्रणेवर असतो. तो भारी ठरतो. तरीही चित्रा वाघ नावाची महिला एवढा आकांड तांडव का करते? त्यांनी तपास पूर्ण व्हायची वाट पाहायल पाहिजे, असंही सुरेश खोपडे यांनी म्हटलंय.

दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे, हे ही मान्य… पण तिच्या आईवडिलांचा संशय नाही. ती 21 वर्षाची मुलगी होती. कसं जगायचं याचा पूर्ण अधिकार तिला आहे… राज्यघटना तसा तिला पूर्ण अधिकार देते… मग चित्रा वाघा यांना एवढं आक्रमक व्हायचं कारण काय?, असा सवालही सुरेश खोपडे यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?”

“खुर्ची इतकी वाईट आहे का, की ज्या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही”

“बेजबाबदार वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत का?”

“उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर संजय राठोडला फाडून खाल्लं असतं”

‘चित्रा वाघच तुम्हाला पुरुन उरणार आहे’; चित्रा वाघ आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More