बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रायगडावर संशयास्पद हालचाली! शिवप्रेमी म्हणाले,”यांची थोबाडं रंगवा”; पाहा व्हिडीओ

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. अशातच किल्ले रायगडावर (Raigad) छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर पुस्तक पुजनावरून दोन गटात वाद झाल्याचं समोर आलं आहे. त्याचा एक व्हिडीओ देखील आता व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

पुस्तक पुजनाच्या बहाण्याने गडावर अस्थिविसर्जनाचा घाट घातला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पुजन करत होतो. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला लेप लावण्याचा प्रयत्न होत असल्याचं शिवप्रेमींच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी या पूजनावर आक्षेप नोंदवला.

पोलिसांनी हस्तक्षेप करत पुस्तक आणि पुजनासाठी आणेलेले साहित्य, राखसदृश्य घटक असल्याचा आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी संशयास्पद वस्तू ताब्यात घेतले आहेत. या राखेची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. त्यात काही महिला शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळच्या पुस्तक पुजनावर आक्षेप घेतलेला दिसत आहे. त्यावर काहीजण स्पष्टीकरण देत असल्याच देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

“जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय हे कसं समजणार?”

‘माझ्यावरचे ‘ते’ आरोप बिनबुडाचे’, कंगनाची उच्च न्यायालयात धाव

बर्ड फ्लूचं सावट; सरकारनं दिले बदक आणि कोंबड्या मारण्याचे आदेश

“बाबरीच्या निकालानंतर आम्ही पार्टी केली, वाईनची बॉटल घेतली आणि…”

नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More