बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलींना शिक्षण देण्यास तालिबानची परवानगी; मात्र घातल्या ‘या’ जाचक अटी

काबूल | तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाण महिलांच्या शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यासंदर्भात देशभरातून अनेक लोकांकडून महिलांच्या शिक्षणाबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अशातच आता तालिबानकडून महिलांच्या शिक्षणासंदर्भात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात अफगाणिस्तानच्या नवीन मंत्रिमंडळात सामील झालेल्या उच्च शिक्षण मंत्री अब्दूल बाकी हक्कानी यांनी अफगाण मुलींच्या शिक्षणासाठीची मार्गदर्शकतत्वे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली आहेत.

अफगाणिस्तानमधील शाळा आणि विद्यापीठांमध्ये मुलींच्या शिक्षणावर तालिबानच्या पहिल्या म्हणजे 1996 आणि 2001 या कार्यकाळात बंदी घालण्यात आली होती. तालिबानने आता राष्ट्रपती भवनावर आपला झेंडा लावल्यानंतर लगेचच त्यांनी शिक्षणावरील नवीन धोरण जाहीर केले. त्यानूसार आता अफगाण मुलींना शाळेमध्ये हिजाब परिधान करावा लागणार आहे. तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळं शिक्षण दिलं जाणार आहे, असं तालिबानकडून सांगण्यात आलं आहे.

शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी फक्त महिला शिक्षकाच पाहिजेत. जर महिला शिक्षिका उपलब्ध झाल्या नाही तर वर्गात चांगल्या चारित्र्याचे आणि वयाने ज्येष्ठ असलेले पुरूष शिक्षक मुलींना शिकवू शकतील, असं उच्च शिक्षण मंत्री अब्दूल बाकी हक्कानी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या विद्यापीठांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांचा आढावाही घेतला जाणार आहे. तालिबानला देशातील विद्यार्थ्यांनासाठी योग्य आणि मुस्लिम अभ्यासक्रम तयार करण्याची इच्छा आहे. तो आमच्या मुस्लिम, राष्ट्रीय आणि ऐतिहासिक मुल्यांना तो संबंधित असणार असल्याचं हक्कानी यांनी म्हटलं आहे    .

थोडक्यात बातम्या- 

‘…पण ठाकरे सरकारने विश्वासघात केला’; भाजपची घणाघाती टीका

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेची तारीख ठरली; ‘या’ 6 केंद्रांवर होणार परीक्षा

“दुसऱ्यांच्या मुलांकडे बोट दाखवण्याआधी आपला मुलगा काय करतो ते पहावं”

“स्वत:ला अग्रस्थानी ठेवून नवा इतिहास लिहिण्याचा भाजपचा प्रयत्न”

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More