क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर! 

नवी दिल्ली | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या एका स्टार खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूने यावर्षीच पाकिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला.

पाकिस्तानचा ऑलराउंडर खेळाडू इमाद वसीम (Imad Vasim) याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटरला अलविदा केला आहे. इमादने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती क्रिकेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

इमादने निवृत्तीच्या निर्णय जाहीर करताना भलीमोठी पोस्ट लिहीली आहे. इमादने यामध्ये मार्गदर्शक, सहकारी आणि क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत.

इमादचा क्रिकेटला अलविदा

पीसीबीने इमादची पोस्ट रिशेअर करत त्याने पाकिस्तान क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानासाठी आभार मानलेत. तसेच पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इमादला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वनडे आणि टी 20 मधील 121 सामन्यांमधील प्रत्येक खेळी ही माझी स्वप्नपूर्ती होती. पाकिस्तान क्रिकेटसाठी नवे कोच आणि कॅप्टनसह भविष्यातील वाटचालीसाठी ही योग्य वेळ आहे. टीमने चांगली कामगिरी करावी यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असं इमादने म्हटलंय.

इमाद वसीमने पाकिस्तानसाठी 55 एकदिवसीय आणि 66 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 4.89 च्या इकॉनॉमीने 44 विकेट घेतल्या आणि 986 धावा केल्या. त्याच वेळी, टी-20 मध्ये त्याने 65 विकेट घेतल्या आणि फलंदाज म्हणून 486 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका

Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर

अभिनेत्री Aishwarya Rai ने केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

Maharashtra Weather Update | राज्यातील ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क मोठ्या संकटात?