बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल डिझेलची कटकट संपणार; आता कोंबड्यापासून तयार होणार बायोडिझेल

नवी दिल्ली |  गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पुणे आणि मुंबईसारख्या शहरात पेट्रोलची किंमत 107 रूपयांवर गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असल्यानं इंधनाचे दर वाढत आहेत, असं केंद्र सरकारकडून सांगितलं जातंय. पण आता पेट्रोल आणि डिझेलची कटकट संपणार आहे. कारण आता कोंबड्यापासून बायोडिझेल तयार होणार आहे.

केरळच्या पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एक महाविद्यालयात प्राध्यापक जाॅन अब्राहम शिकवतात. प्राध्यापक म्हणुन काम करत असताना ते विविध विषयावर संशोधन देखील करत आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते चिकन वेस्टपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी तंत्र विकसित करत होते. अखेर त्यांच्या या प्रयोगाला यश मिळालं आहे. त्यांना या शोधासाठीचं पेटंटही देण्यात आलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत या बायोडिझेलची किंमत कमी आहे. या बायोइंधनाद्वारे एक लीटरमध्ये गाडी 38 किलोमीटर प्रवास करते. तर प्रदूषण रोखण्यासाठी देखील हे बायोइंधन मदत करू शकतं. वायनाड येथील महाविद्यालयात प्राध्यापक जाॅन अब्राहम यांनी हे बायोडिझेल विकसित केलंय. त्यासाठी त्यांनी तब्बल 18 लाख रूपयांचा खर्च आला आहे.

दरम्यान, कोंबड्या आणि डुकरांच्या विष्ठेत विशिष्ट घटक असल्यानं त्यापासून सामान्य तापमानाला तेल काढणं सोपं असतं. त्यामुळे बायोडिझेल प्रक्रिया सोपी होते. 100 किलो चिकन वेस्टपासून 1 लीटर बायोडिझेल तयार केलं जाऊ शकतं. तर या बायोडिझेलला भारत पेट्रोलियमकडून गुणवत्ता प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

खासदार सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का; ठाकरे सरकारची ‘ही’ मोठी कारवाई

पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ मोठे निर्देश

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणतात…

चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही होतोय कोरोना संसर्ग

मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील – राजेश टोपे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More