बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरूख खानच्या अडचणी वाढल्या! ड्रग्ज प्रकरणात आर्यनने केला मोठा खुलासा म्हणाला; मी ड्रग्ज…

मुंबई | ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धडक कारवाई केली होती. यावेळी आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जयस्वाल, विक्रांत छोकेर, गोमित चोप्रा या आठ जणांची रेव्ह पार्टी प्रकरणी चौकशी केली जात आहे, असं वानखेडे म्हणाले. अशात या ड्रग्ज प्रकरणी आता एका बड्या माजी क्रिकेटपटूच्या मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

एनसीबीच्या माहितीनुसार आर्यन खानने मान्य केलं आहे की, तो या पार्टीचा एक भाग होता. तसेच आर्यनने आपण चूक केल्याची कबूलीही दिली आहे. तसेच माहितीनुसार आर्यनने ड्रग्जचं सेवन केलं असल्याचं कबूल केलं आहे. तसेच अभिनेता शाहरूख खानने आपल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांच्याशी संपर्क केला आहे.

दरम्यान, सुरूवातीस एनसीबीच्या प्राथमिक चौकशीमध्ये आर्यन म्हणाला होता की, मला फक्त गेस्ट म्हणून बोलावलं होतं. तसेच त्याच्याकडून कुठलंही मानधन देण्यात आलं नव्हतं. फक्त त्याच्या नावाचा वापर करत इतरांना बोलावण्यात आलं असल्याचं म्हटलं होतं. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल जप्त केल्यानंतर त्यात काही चॅटस मिळाले आहेत. त्यात, त्यामध्ये आर्यननं हौस म्हणून ड्रग्ज घेतलं असल्याची कबूली दिल्याची माहिती समजत आहे.

थोडक्यात बातम्या –

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जींचा मोठ्या मताधिक्याने विजय!

शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सचिन वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शाहरुखच म्हणाला होता, “माझ्या मुलानं ड्रग्ज घ्यावेत, पोरींच्या मागं जावं, सेक्स करावा”

ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी- संजय राऊत

“जेव्हा पण घटस्फोट होतो, तेव्हा दोष नेहमी पुरूषांचाच असतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More