बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

 पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे भररस्त्यात फाडले कपडे आणि नंतर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

चंदीगड | चंदीगडमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांबाबत कायम एक भीती लोकांमध्ये असते मात्र, काही वेळा पोलिसांच्याच परिवारातील सदस्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना चंदीगडमध्ये उघडकीस आली आहे.

या घटनेत काही तरूणांनी एका एसएचओच्या मुलीचे भररस्त्यात कपडे फाडले. इतकंच नाही तर मुलीनं त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपी तरूण तिच्या मागे तलवार घेऊन पाठलाग करू लागले. पोलिसांनी याप्रकरणी 6 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना पंजाबच्या फिल्लौर येथील लुधियानातील आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला झालेली महिला आपल्या माहेरी राहण्यासाठी आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून तिच्या मुलीची तब्येत खराब असल्याने ती आपल्या 8 महिन्याच्या मुलीला भावासोबत फिल्लौरमधील एका रुग्णालयात घेऊन गेली होती. उपचारानंतर ती दवाखान्यातून संध्याकाळी घराकडे निघाले असता गावातीलच काही तरुणांनी त्यांची अडवणूक केली.

दरम्यान, आम्हाला का अडवलं? असा सवाल त्या महिलेनं तरूणांना विचारला. तेव्हा या तरुणांनी महिलेच्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर, आरोपी तरूणांनी यावेळी महिलेचे कपडेही फाडले. आपल्या चिमुकलीला घेऊन तिनं भावासोबत घराकडे जाणाऱ्या गावाची वाट धरली. मात्र, तरूणांनी हातात तलवारी घेऊन त्यांचा पाठलाग केला. पाठलाग करता करता आरोपींनी त्यांच्यावर विटा आणि दगडही फेकले होते. यामुळे रस्त्यातील एका गाडीच्या काचाही फुटल्या. पोलीस ठाण्यात एका कर्मचाऱ्यानं सांगितलं, की पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीला रस्त्यात अडवून तिचे कपडे फाडल्याप्रकरणी आणि पाठलाग केल्याप्रकरणी गोपा, लव आणि त्याच्या 4 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सदर प्रकरणी पोलिसांद्वारे पुढील तपास चालू आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला उकाड्यापासून दिलासा; संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पावसाला सुरुवात

20 रुपये दिले नाही म्हणून पतीची हत्या, मुलांचा सांभाळ कोण करणार? पत्नीचा टाहो

ब्लॅक फंगस आजारावरील उपचाराबाबत राज्य सरकारचं उच्च न्यायालयात ‘हे’ मोठं स्पष्टीकरण

लसीकरणाबाबत मोठी बातमी! ऑनलाईन नोंदणी न करताही 18 ते 44 वयोगटाला मिळणार कोरोना लस; जाणून घ्या कसं

रुग्णालयाची खिडकी तोडून अडाणी चोरट्यांनी कोरोना लस समजून नेले ‘हे’ 25 लसींचे डोस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More