बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राम नामाचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी; राम यांच्यापासून किती लांब आहे, हे स्पष्ट होतंय”

मुंबई | भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. यावरून शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला होता. तर राजकीय पटलावर देखील भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादीने देखील उडी घेतली आहे.

राममंदिरासाठी जमा केल्या जाणाऱ्या निधीत भ्रष्टाचार होत असल्यास ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.

राममंदिरासाठी रामभक्त मोठ्या प्रमाणावर निधी देत आहेत. पण यात काही लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून ते किती लांब आहेत हे स्पष्ट होतं. रामनामाचा वापर करून विविध राजकीय आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, राम मंदिराच्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि शिवसेना आमने सामने आले आहेत. जयंत पाटलांनी आता या वादात उडी घेतल्यानं भाजप जयंत पाटलांच्या वक्तव्यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आई बापाच्या कष्टाचं चीज, पंढरपुरातील मजूराच्या पोराची इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

“शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्याही पुढे गेली”

चिंताजनक! म्युकरमायकोसिसमुळे मुंबईत तीन लहान मुलांचे डोळे काढावे लागले

“महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही”

“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More