Rain Update | राज्यातील ‘या’ भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | ऐन हिवाळ्यात (Winter Season) राज्याच्या अनेक भागात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. नोव्हेंबरच्या (November) शेवटच्या आठवड्यात सुद्धा पावसाचं काही ठिकाणी आगमान झालं आहे. विजेच्या कडकडटीसह अनेक भागात पावसानी हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन हिवाळ्यात छत्री आणि रेनकोट घालून घरा बाहेर पडावं लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (Meteorological Department) महत्त्वाची माहिती दिली आहे. 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता. या पावसाचा रब्बी पिकांना (Rabbi Crops) फायदा होणार आहे. मुंबईतील (Mumbai) अनेक भागांतही शनिवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे.

दरम्यान, मुंबईत आलेल्या या पावसामुळे हवेतील प्रदूषण (Air Pollution) कमी होणार असल्याचं हवामान विभागकडून सांगण्यात आलं आहे. तर मुंबईतील वसई (Vasai), विरार (Virar) , नालासोपारा (Nalasopara) या परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मेघागर्जनेसह (Thunderstorm) पावसाने हजेरी लावली आहे.

शिवाय, या भागांत पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसामुळे वातावरणात (Climate) गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे म्हणजेच कल्याणमध्ये (Kalyan) वीजांसह रिमझिम पाऊस सुरु झाला आहे. यामुळे रविवारी पहाटे कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

हवामान विभागाने राज्यभरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. मुंबईतील अंधेरी, (Andheri) घाटकोपर, (Ghatkopar) विक्रोळी, (Vikroli) भांडुप,(Bhandup) मुलुंड (Mulund) परिसरात मध्यरात्री पासून रिमझिम पाऊस सुरू आहे. शहापुरात अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खळ्यांमध्येसाठून ठेवलेल्या भाताचा पाऊसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या-

Manoj Jarange | ‘या’ बड्या नेत्याचा सल्ला मनोज जरांगेंना मान्य!

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका

Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर

अभिनेत्री Aishwarya Rai ने केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

Maharashtra Weather Update | राज्यातील ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी