मनोज जरांगेंकडून अजित पवारांची पोलखोल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

शेवगाव | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या मराठा आरक्षणासाठी राज्य दौऱ्यावर आहेत. आमरण उपोषणानंतर जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या राज्यात जाऊन जाहीर सभा घेतल्या. विशेष म्हणजे जरांगेंच्या सभेला लाखो मराठा बांधवांनी प्रचंड पाठिंबा दिला.

दरम्यान, सभेत बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेते मंडळी यांच्यावर टीका तर केलीच मात्र अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तर चांगलाच हल्लाबोल केला. यासोबतच महाराष्ट्राचे उपुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

सभेत बोलत असताना अजित पवारांबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “जर अजितदादा काल म्हणत असतील, मी त्यांना तंबी दिली. तर नेमकी कोणती तंबी दिली? मराठ्यांचे बोर्ड फाडण्याची?. इथून पुढे शांतता राहावी म्हणून दिली. तुम्ही यात बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे. आम्ही मराठ्यांना शांत केलं आहे.”

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात दंगल होऊ नये, यासाठी आम्ही रात्रंदिवस बैठका घेत आहोत. पोलिस आमच्यावर कारवाई करत आहेत. दुसरीकडे भुजबळ दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार हे मंत्री छगन भुजबळांना साथ देत आहेत का? सरकार दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न देखील जरांगे पाटील यांनी केला. राज्य सरकारने आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरणार नाही आणि थांबणार नाही. मराठ्यांच्या हितासाठी मी कोणताही गुन्हा करण्यास तयार आहे, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका

Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर

अभिनेत्री Aishwarya Rai ने केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

Maharashtra Weather Update | राज्यातील ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क मोठ्या संकटात?