मोठी बातमी! भाजप खासदाराला अज्ञाताने दगड फेकून मारले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाजप खासदार अनिल बोंडे (Bjp Mp Anil Bonde) यांच्यावर काही अज्ञात लोकांनी दगड मारल्याची घटना समोर आली आहे. अनिल बोंडे यांच्यावर अज्ञातांनी दगड भिरकावल्याने त्यांना डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली

नेमकं काय घडलं?

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या तीन दिवसांपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तर काल या शर्यतीचा शेवटचा दिवस असल्याने त्या कार्यक्रमाला अनिल बोंडे भेट देण्यासाठी गेले होते.

मागच्या बाजूने चार ते पाच दगड भिरकण्यात आले त्यातील एक दगड बोंडे यांच्या खांद्याला लागला यानंतर त्यांना थोडीशी दुखापत झाली. या घडलेल्या घटनेनंतर अनिल बोंडे यांनी तिवसा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

दगडफेकीमागे राजकीय हात असल्याच्या बोडेंना संशय

याप्रकरणी तिवसा पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अनिल बोंडे यांनी यामागे राजकीय हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका

Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर

अभिनेत्री Aishwarya Rai ने केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

Maharashtra Weather Update | राज्यातील ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क मोठ्या संकटात?