“दारुच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार”

पुणे | मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सध्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जनतेशी संवाद आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात कानोसा घेत आहेत. अनेक महिलांचे संसार या दारूमुळे उध्वस्त होत आहेत. दारुच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार, असा संतप्त इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी फडणवीस यांना दिला आहे.

राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिला दारूबंदीसाठी अनेक मोर्चे काढत आहेत. गुन्हेगारी वाढत आहे. युवकांचे नुकसान आणि प्राण जात आहेत तरीसुद्धा राज्य सरकार “महाराष्ट्रात दारूबंदी” करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

राज्य सरकारची “दारूची बाटली म्हणजे मृत्यूची बातमी ” अशी जाहिरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पण हीच दारूची बाटली राज्य सरकारच्या परवानगीनेच सर्वांना देण्यात येत असल्याचंही देसाई म्हणाल्या.

तातडीने महाराष्ट्रात दारूबंदी करावी. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात पहिल्या पाच मुद्द्यांपैकी “दारूमुक्त महाराष्ट्र”हा मुद्दा घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही  तृप्ती देसाई यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत उद्या सायंकाळी पाच वाजता भूमाता ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून त्यांच्या बरोबरील इतर मंत्र्यांनाही दारूच्या बाटल्या हातात घेऊन त्यांचं स्वागत करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-