सुशांतच्या फ्लॅटला मिळाला नवा भाडेकरू, भाडं वाचून डोळे पांढरे होतील

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूने संपूर्ण कलाविश्वात एकच खळबळ उडाली होती. सुशांतच्या मृत्यूला जवळजवळ अडीच वर्षांचा कालावधी उलटला असला तरी त्यांच्या मृत्यूबाबत आजही अनेक धक्कादायक खुलासे होतात. (SSR Death Case)

सुशांत वांद्र्यातील (Bandra) मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमधील डुप्लेक्स घरात किरायाने राहात होता. सुशांतने 14 जून 2020 रोजी त्याच्या वांद्रे येथील याच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने खरंच आत्महत्या केली की त्याची हत्या झाली यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. सुशांतच्या मृत्यूनंतर व्हायरल झालेल्या अनेक गोष्टींमुळे त्या घरात कोणीच राहायला तयार नव्हतं.

मात्र, आता सुशांतच्या मृत्यूच्या तब्बल अडीच वर्षांनंतर त्या फ्लॅटला नवा भाडेकरू मिळाला आहे. रियल इस्टेट ब्रोकर रफिक मर्चंट यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबतची माहिती दिली आहे. आम्हाला आता एक भाडेकरू सापडला असून गोष्टी नक्की करण्यासाठी चर्चा सुरू आहे. सुशांतच्या मृत्यूला आता बराच काळ लोटल्याने लोक शांत असल्याची प्रतिक्रिया त्या ब्रोकरने दिली.

सुशांत राहात होता तो फ्लॅट 3600 स्क्वेअर फूट परिसरात बांधला आहे. यात 4 बेडरूम असून टेरेस देखील जोडलेली आहे. या फ्लॅटसाठी एक महिन्याचं भाडं हे तब्बल 5 लाख रूपये आहे. एवढंच नाही पण या घरासाठी भाडेकरूला 30 लाख डिपॉजिट पण जमा करावं लागणार आहे.

दरम्यान, सुशांत 2019 साली या घरात राहायला गेला होता. या घरासाठी सुशांत महिन्याला 4.5 लाख रुपये भाडं देत होता. मात्र, आता घरमालकाने या घराचं भाडं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-