आहारात ‘या’ भाजीचा समावेश करून करा झटपट वजन कमी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | धकाधकीचं जीवन, बदलती जीवनशैली (Lifestyle), खाण्या-पिण्याच्या बदलत चाललेल्या सवयी या सगळ्यांचे आपल्या आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होतात. आजकालचा आहार हा अनेक रोगांना आमंत्रण देणारा आहे.

खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना लठ्ठपणा येतो. अनेकदा प्रयत्न करूनही वजन कमी करण्यात (Weight Loss) यश येत नाही आणि परिणामी डायबिटीज (Diabetes), ह्रदय विकार (Heart Disease) यासारख्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. वजन कमी करण्यासाठी अनेकजण महागडी जीम, स्ट्रिक्ट डाएटचा पर्याय निवडतात. पण आपल्या रोजच्या जेवणातील काही पदार्थांमुळेही वजन कमी करण्यात मदत होते.

जेवणात अनेकदा आपण पत्ताकोबीचा (Cabbage) समावेश करतो. कोबी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पत्ताकोबीत शरिरासाठी आवश्यक पोषक फायबर, जीवनसत्त्वे B1, B6, K, E आणि C, बीटा कॅरोटीन, अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात.

तुम्ही पण वजन कमी करण्याचा विचारात असाल तर त्यासाठी पत्ताकोबी एक चांगला पर्याय आहे. जलद वजन कमी करण्यासाठी कोबीचे सूप (Cabbage Soup) पिणे फायदेशीर आहे. यासाठी कोबी बारीक चिरून पाण्यात उकळा. आता त्यात लसूण, कोथिंबीर, आलं आणि मीठ टाकून सूप तयार करा. हे सूप गरम-गरम पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करायचं असेल तर कोबीच्या सूप प्रमाणे कोबीची भाजीही फायदेशीर ठरते.

दरम्यान, कोबीचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. कोबीमुळे फक्त वजन कमी होण्यासच मदत होत नाही तर कोबीच्या सेवनामुळे अल्सर, इरिटेबल बोवेल सिंड्रोम यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो.

शेवटी एक महत्त्वाची टीप, वरील माहिती सामान्यज्ञानावर आधारीत असून आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

महत्त्त्वाच्या बातम्या-