गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज आली समोर

मुंबई | सध्या गौतमी पाटीलच्या(Gautami Patil) लावणीनं(Lavani) महाराष्ट्रभर धुमाकूळ घातल्याचे दिसत आहेत. गौतमीची लावणी पाहण्यास प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. म्हणूनच सध्या लावणी म्हटलं की गौतमीचं नाव समोर येत आहे.

गौतमीच्या लावणीची क्रेझ असली तरीही गौतमीला विरोध करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. गौतमीच्या लावणीत अश्लीलता असते, असं म्हणत अनेकांनी गौतमीच्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यानंतर गौतमीच्या लावणीवर बंदी घालावी की नाही यावरून चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.

अशातच आता गौतमीच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. गौतमी लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे. ती आगामी ‘घुंगरू’ या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटाचं शूटिंग सोलापूर, हंपी, माढा या ठिकाणी झालं आहे. या चित्रपटाचं शूटिंग परदेशातही झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं तिचे चाहते प्रचंड आनंद झाले आहेत.

गौतमीच्या चित्रपटाचं परदेशात शूटिंग झाल्यानं अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं कौतुक करत आहेत. त्यामुळं सध्या ती चर्चेत आहे.

दरम्यान, गौतमीच्या लावणी कार्यक्रमादरम्यान तर प्रेक्षक इतके धुमाकूळ घालत असतात की अक्षरश: पोलिसांना चाहत्यांना आवर घालावा लागतो. परंतु असं असलं तरी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत असतो.

महत्वाच्या बातम्या-