बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार- उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. सर्वात आधी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतरच ठरवणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मला कोणत्याही परिस्थितीचं राजकारण करायचं नाही, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही योग्य मदत करतील, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टरमधून नाहीतर जमिनीवरुन पाहणी करतोय. मी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय’; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

पंजाबमध्ये भारतीय वायुसेनेचं फायटर जेट कोसळलं; एका पायलटचा मृत्यु, पाहा व्हिडीओ

राज्यातील 26 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, पाहा कुणाची बदली कुठे?

‘गांगुली स्वार्थी होता, त्याला…’; ग्रेग चॅपेल आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More