बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनोखा निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर ‘या’ ठिकाणी केलं जाणार मोबाईलचे सीमकार्ड ब्लाॅक

इस्लामाबाद | देशांत सध्या लसीकरणाला वेग आला आहे. कोरोना लस घेण्याबाबत अजूनही अनेक लोक नकार देताना दिसत आहेत. अशातच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात लस न घेणाऱ्यांचे सीमकार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंजाब प्रांतात कोरोना लस घेण्यापासून नागरिक पळ काढत आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात यश येत नाही. राज्यातील 3 लाख लोक असे आहेत ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आता दुसरा डोस घेण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळं सरकारची डोकेदुखी वाढली आहे. म्हणून सरकारनं अजब निर्णय घेतला असल्याचं पंजाब प्रांतातील आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

याआधी पाकिस्तानच्या सिंध प्रांत सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही तर त्यांचा पगार स्थगित केला होता. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शहा यांनी अधिकाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, ज्या लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस वेळेत घेतला नाही अशा लोकांची यादी तयार केली जात आहे. यातील काही जणांचा दुसरा डोस घेण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर काही जण कोरोना संक्रमित झाले होते. त्यानंतर अनेकांनी कोरोना लस न घेण्याचं ठरवलं, असं पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

गप्पा मारण्याच्या नादात नर्सनं एका व्यक्तीलाच दिले कोरोना लसीचे दोन डोस अन्…..

‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्यावर राखीने केला भर पावसात डान्स, व्हिडीओ व्हायरल

शेवटी आईच हो ती! सिंहाच्या जबड्यातून म्हशीने माघारी आणलं रेडकाला, पाहा थरारक व्हिडीओ

भुकेल्या हत्तीने चक्क हेलमेट खाल्लं, पाहा व्हिडीओ

एकवेळ सवलत मिळेल, पण वीजबिल माफ होणार नाही- नितीन राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More