Weather Alert: राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस कोसळणार; उकाड्यापासून सुटका
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात मोठी वाढ होत आहे. नागरिक उकाड्यामुळे त्रस्त आहेत. त्यातच आता हवामान विभागाकडून (Weather Alert) राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.
काही दिवसांपुर्वी कोकणातही उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळाली होती. कोकणातील तापमानात अचानक वाढ झाली होती. राजधानी मुंबईत देखील कमालीचं तापमान वाढलं होतं. त्यातच आता कोकणातील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या 5 आणि 6 एप्रिलला कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात एकीकडे पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कडक उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यु झाला होता. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून स्वत:चा बचाव करावा, असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानात घट होणार आहे. मात्र, या काही दिवसांत नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करावं, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
Sharad Pawar: शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका, म्हणाले…
“महागाई कमी होण्यासाठी प्रार्थना करा”; गिरीश बापटांचा भाजपला घरचा आहेर
“6 खासदारांवर कुणीही पंतप्रधान होत नाही हे शरद पवारांना…”
“गृहखाते काय भाजपच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी तयार केलं आहे का?”
“मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो म्हणून…”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Comments are closed.