‘..तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहिल’, पुतिन यांचा युक्रेनला थेट इशारा
कीव | रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. रशियाकडून होत असलेले बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले, गोळीबार यामुळे युक्रेन हादरलं असून मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी युरोपीयन देशांचा रशियावर दबाव आहे तरी देखील रशियाने अद्यापही युद्द थांबवलेलं नाही.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीचे पंतप्रधान तय्यिप एर्दोगन आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात फोनद्वारे चर्चा झाली. यावेळी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला थेट इशारा दिला आहे. युक्रेनने आमच्या मागण्या मान्य कराव्यात या निर्णयावर पुतिन ठाम आहेत.
युक्रेनने शस्त्र खाली टाकावीत आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही युक्रेनमधून आमचे सैन्य माघारी बोलावू. तोपर्यंत युद्ध सुरूच राहिल, असा थेट इशारा व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला दिला आहे.
दरम्यान, नाटोचे सदस्यत्व मिळवण्यासठी युक्रेन प्रयत्नशील आहे. तर युक्रेनने नाटोचे सदस्यत्व स्विकारू नये अशी रशियाची मागणी आहे. मात्र, युक्रेन त्यांच्या मागणीवर ठाम असल्याने रशियाने युद्धाला सुरूवात केली. रशियाकडून युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले होत असून दिवसेंदिवस परिस्थिती भयावह होत आहे.
थोडक्यात बातम्या-
“…म्हणून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर राग आहे”
“राज्यपालांना इथून हटवणं एका मिनिटाचं काम आहे”
मोठी बातमी! मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज
“निकाला आधीच मी येणार, मी येणार सांगत होते, पण आम्ही काय येऊ देतो”
“हिंदूह्रदयसम्राटाची पदवी बाळासाहेबांनंतर देवेंद्र फडणवीसांना देण्यात यावी”
Comments are closed.