मुंबई | संजय राऊतांची(Sanjay Raut) रविवारी दिवसभर ईडीकडून(ED) चौकशी झाली आणि रविवारी उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. काहिंनी त्याला पाठिंबा दिला तर काहिंनी त्याला विरोध केला. जेष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन(Jaya Bacchan) यांनीही संजय राऊतांच्या अटकेवर आपली प्रतिक्रया दिली आहे.
जया बच्चन यांना संजय राऊतांच्या अटकेवर प्रश्न विचारण्यात आले. संजय राऊतांना ईडीने अटक केली आहे, ईडीचा दुरूपयोग केला जातोय, असं तुम्हाला वाटतंय का?, असा प्रश्न विचारल्यावर जया बच्चन म्हणाल्या, अर्थातच ईडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला पाहिजे. 11 लाखांसाठी तुम्ही कोणालातरी त्रास देत आहात, असंही जया बच्चन म्हणाल्या.
ईडीचा वापर अशा प्रकारे कधी पर्यंत चालेल ?, असा प्रश्न विचारल्यावर, 2024 पर्यंत हे चालेल अशा कठोर शब्दात जया बच्चन यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तर या संपूर्ण प्रकरणाला भाजप जबाबदार आहे, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, जया बच्चन यांच्यानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्रा(Sharlyn Chopra) यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. मोदीजींच्या टीममध्ये सर्व श्रीकृष्ण आहेत. सुदर्शन चक्र तर सुटले आहे, असं चोप्रा यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘फोन लावण्यासाठी मी पायलटला विमान थांबवायला सांगितलं’, एकनाथ शिंदेंनी सांगितला तो किस्सा
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या फैसला?, चार याचिकांवर सुनावणी होणार
‘संजय राऊत आले आणि सगळं फिसकटलं’, बंडखोर आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
संजय राऊतांना न्यायालयाचा दणका, ईडी कोठडीतील मुक्काम वाढवला
‘सगळेच दिवस सारखे नसतात दिवस फिरतात, त्यामुळे…’, उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Comments are closed.