बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जालन्यात डीवायएसपी आणि सात ते आठ पोलिसांचा भाजप पदाधिकाऱ्याला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

जालना | सध्या सोशल मीडियावर जालन्यामधील पोलिसांचा एका तरूणाला मारहाण करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  व्हिडीओमध्ये पोलीस अमानुषपणे एका तरूणाला मारहाण करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात दोन लाखांची लाच घेण्याच्या प्रकरणात अडकलेले जालन्याचे डीवायएसपी सुधीर खिरडकर आणि त्यांच्यासह सात ते आठ पोलीस कर्मचारी मारत आहेत.

व्हा व्हिडीओ 9 एप्रिलचा आहे. दर्शन देवावाले याचा अपघात झाला होता. त्याला शहरातील दीपक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र त्याचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. संतापलेल्या नातेवाईकांनी त्यावेळी रूग्णालयातील आयसीयूची तोडफोड केली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली  तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांना मारहाण केल्याचं समजत आहे.

मारहाण करताना पोलीस अमानुषपणे मारताना दिसत आहे. व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यावर डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्यावर अनेक संघटना, पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित पोलिसांची कायम स्वरूपी निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, ज्या तरूणाला पोलीस मारताना दिसत आहेत तो भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची माहिती आहे. यावरून जालना शहरातील भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला याच्यावर अमानुष हल्ला करणाऱ्या मुजोर पोलिसांचं निलंबन होत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही, संबंधित पोलिसांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने पत्नीवर गोळ्या झाडून त्यानंतर केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

“लाॅकडाऊन आपल्याला हळुहळु उघडावा लागेल, लगेचच सर्व काही उघडणार नाही”

बापरे! मानवी वस्तीमध्ये आला ‘हा’ भला मोठा प्राणी…, पाहा व्हिडीओ

लग्नात मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण दमला; रिकाम्यावेळात नवरा-नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘रोहितने केलेल्या चूका तू करु नको’; भारताच्या ‘या’ मोठ्या माजी खेळाडूचा ऋषभ पंतला सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More